Raksha Bandhan Wishes in Marathi: रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीचा पवित्र सण आहे आणि तो भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ त्याचे रक्षण करण्याचे वचन देतो, आज आम्ही तुमच्यासाठी एक अप्रतिम संग्रह New Raksha Bandhan Wishes in Marathi सादर करत आहोत. तुम्हा सर्वांना ते खूप आवडेल अशी आशा आहे.
Raksha Bandhan Wishes in Marathi
राखी बांधून हातात,बहिण ओवळे भावाला
भरून साखर तोंडात जीव लावेल भावाला
निराळ्या मायेचा झरा,कायम असाच भरलेला
वाहत राहो निखळपणे,शुभेच्छा बहिण-भावाला
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र
दिनी मी तुला देऊ इच्छितो.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत राहा हीच इच्छा.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तु माझा आधार,तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई
मला दिला मोठा आधार
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
दादा तुला कधीच सोडणार नाही.
आणि रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा
माझा हक्क कधीच कोणाला घेऊ
देणार नाही.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण-भावाचा पवित्र सण
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम,
आठवण करन देत राहील..
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलंच तर त्याला आधी,
मला सामोरे जावे लागेल.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
दृढ बंध हा राखीचा
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलणारं
अलवार स्पंदन आहे.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
हातावर राखी बांधून आज
तू दे मला वचन
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास
तरी राहशील माझ्या जवळ.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
लहान बहिणीसारखी चांगली गोष्ट
आयुष्यात असू शकत नाही.
आणि दादा म्हणून
बोलावणाऱ्या बहिणीशिवाय
गोड कोणीच होऊ शकत नाही.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुझ्या माझ्या नात्यात एक
विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो
तरी त्यात जिव्हाळा आहे.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आपल्या बहिणीसारखी
दुसरी मैत्रीण कोणीच नसते
नशीबवान असतात ते
ज्यांना बहीण असते.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची
साथ असते
नेहमी माझ्या मनात दादाला
भेटण्याची आस असते.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
कितीही उशीर झाला तरी
तुला भेटल्याशिवाय राहणार नाही.
लग्न झाले म्हणून काय झाले.
तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून
कधीच जाणार नाही.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोणती राखी तुझ्यासाठी निवडू
असा नेहमीच प्रश्न पडतो
पण कोणतीही राखी आणली तरी
तू तुझे काम अगदी
जबाबदारीने पार पाडतोस.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आईने दिला जन्म पण
तू घेतली माझी सगळी जबाबदारी
काही तरी केले होते पूण्य म्हणूनच
तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
लहानपणीच्या राखी
मी आजही जपून ठेवल्या आहेत
या प्रत्येक राखीसोबत
तुझी आणि माझी आठवण जोडली आहे.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
माझ्या आयुष्यातील तुझे स्थान
कधीच कोणी घेऊ शकत नाही.
जीव आहे तोवर तुझी काळजी
घेतल्याशिवाय राहू शकत नाही.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
मानलेल्या बहीण भावाचं नात हे रक्ताचं
नसल तरी ते रक्ताच्या
नात्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतं,
जे फक्त सुखात नाही तर दुःखात साथ
देत तेच खर बहीण भावाचं नात असत.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
लहानपणीच्या राखी मी आजही जपून
ठेवल्या आहेत या प्रत्येक राखीसोबत
तुझी आणि माझी आठवण जोडली आहे.
!! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
मित्रांनो, आम्ही आशा करतो की हा collection“New Raksha Bandhan Wishes in Marathi” तुम्हा सर्वांना खूप आवडले असते.आपल्याला हा collection आवडला असेल तर कमेंट करून सांगा. तुमची एक टिप्पणी आम्हाला अधिक चांगले collection पोस्ट करण्यासाठी प्रेरित करते. तुम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत हा collection शेअर करू शकता.