Best Ganesh Visarjan Messages in Marathi | गणपती विसर्जन निमित्त मराठी शुभेच्छा 2023 | अनंत चतुर्दशी
Ganesh Visarjan (गणपती विसर्जन):गणेश चतुर्थीच्या दिवसापासून सुरू होणाऱ्या या उत्सवाच्या दहाव्या दिवशी गणेश जीचे विसर्जन केले जाते. या दिवसाला अनंत चतुर्दशी असेही म्हणतात कारण हा चतुर्दशीचा दिवस आहे. या दिवशी गणेशाची मूर्ती समुद्र, नदी किंवा तलावामध्ये मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने विसर्जित केली जाते. या वर्षी अनंत चतुर्दशीचा दिवस 28 सप्टेंबरला आहे.
येथे आम्ही आपल्या सर्व मित्रांसाठी गणपती विसर्जन शुभेच्छा संदेश, शायरी, कोट्सचा एक अद्भुत संग्रह आणला आहे, आशा आहे की आपणा सर्वांना हा संग्रह खूप आवडेल.
Ganesh Visarjan Messages in Marathi
निरोप देतो आता देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही देवा क्षमा असावी.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
वंदितो तूज चरण
आर्जव करितो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहुद्या सदैव छत्रछाया.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
दाटला जरी कंठ तरी निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..पुन्हा येणार तु वर्षाने..!
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
बाप्पा चालला त्याच्या घरी
तुझा आशीर्वाद असाच राहो
सर्व भक्तांच्या माथ्यावरी.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
एक दोन तीन चार
गणपतीचा जय जयकार
पाच सहा आणि सात
बाप्पा आहे आमच्या मनात.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
अडचणी खूप आहेत जीवनात,
पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद
फक्त तुझ्यामुळे येते…
निरोप घेताना एकच आर्शीवाद दे या
संकटातून सर्वांची सुखरूप सुटका होऊ दे.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
बाप्पा तुम्ही आज जात आहे,
आभाळ अगोदरच रडत आहे.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
तू तर ठेवा, सकल कलांचा,
सुगंध तू तर शब्दफुलांचा,
निराकार तू कलाकार तू,
बाप्पा माझी चुकभूल सावरा..!!
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
आभाळ भरले होते तु येतांना
आता डोळे भरून आलेत तु जातांना
काही चुकलं असेल तर माफ कर
पुढल्या वर्षी ये लवकर.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
आनंदमय करून चालले तुम्ही
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
ज्या जल्लोषात बाप्पाचे
आगमन केले त्याच
जल्लोषात आज
त्याला निरोप देणार
मिरवणुकीत मोरयाचा
अखंड नाद दुमदुमणार.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
बाप्पा आज तू जात आहेस
माझं मनच नाही बघ
आभाळपण रडत आहे.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
स्वर्गात जे सुख नाही,
ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे,
तुझ्या नावातच समाधान आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी
सर्व भक्तांच्या
आयुष्यातील वेदना,
दु:ख कमी होवो…
हिच बाप्पा चरणी प्रार्थना.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
घातली रांगोळी दारी,
नैवेद्य मोदकाचा केला,
अनंत चतुर्दशीला गणराज
माझा पुन्हा घरी निघाला..!!
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तु येतांना
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांचा मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत
हीच गणरायांच्या चरणी प्रार्थना.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
जाण्यास निघाला गणपती बाप्पा,
सारगतीरी जमला
गोपाळांचा मेळा,
खिन्न मनाने सारे म्हणतील..
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
बाप्पा तुझा हात सदैव
आमच्या माथी असू दे, तुझी
साथ जन्मोजन्म असू दे,
आनंद येऊ दे घरी,
प्रत्येक कामात मिळू दे
ऐश्वर्य समृद्धी…
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
रुप तुझे देखणे किती
अविस्मरणीय वाटते पुन्हा पुन्हा पाहता
किती ओढ वाटते कोणत्या रूपामध्ये
भेटशील ना कळे धन्य जन्म
वाटतो “मोरया” तुझ्यामुळे..!!
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
देव आला माझ्या घरी,
हौस भागवली दर्शनाची,
पुन्हा आला तो क्षण,
बाप्पा वेळ झाली तुझी परत
तुझ्या घरी जाण्याची..!!
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
ढोल ताशांच्या
गजरात, माझा बाप्पा
निघाला थाटामाटात..!!
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
मोदकाने प्रसाद केला,
लाल फुलाने हार सजवला,
मखरात बसून तयार झाले,
बाप्पा आमचे गावाला निघाले.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
निरोप देऊ आज आनंदानं,
सेवा करण्याचा प्रयत्न केला लेकरानं,
काही चुकलं असेल तर देवा माफ
कर आम्हाला मोठ्या अंत:करणानं.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
जडलाय तुझ्या रूपाचा ध्यास,
पूर्ण कर भक्ताची आस,
आर्शीवादासह घेतोय निरोप,
पुढच्या वर्षी करीन आणखी
सुंदर करायची आहे आरास..
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
डोळ्यात आले अश्रू बाप्पा
आम्हाला विसरू नका आंनदमय करून
चालले तुम्ही पुढल्या
वर्षाची वाट पाहू आम्ही..!!
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
तुझं येणं धुमधडाक्यात,
तुझं जाणं धुमधडाक्यात,
एवढीच इच्छा कायम राहा
तुमच्या आमच्या मनात..!!
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
तू निघालास पुन्हा
परतीच्या वाटेवर
तुझ्या निरोपाचा क्षण येतास
मन झाले अनावर.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
रूप तुझे देखणे
किती अविस्मरणीय वाटते
पुन्हा पुन्हा पाहता
किती ओढ वाटते
कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे
धन्य जन्म वाटतो मोरया तुझ्यामुळे…!
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
बाप्पा चालले आपल्या गावाला
चैन पडेना आमच्या मनाला
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
गणपती विसर्जनाच्या दिवशी
मंगलमूर्ती तुमच्या आयुष्यातील सारी
दुःख वेदना घेऊन जावो
हीच आमची कामना.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
रिकामं झालं घर,
रिता झाला मखर
पुढल्या वर्षी लवकर येण्यास
निघाला आमचा लंबोदर.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
बाप्पा,माझ्या जिवाभावाच्या
माणसांना उदंड आयुष्य दे
तुझे लक्ष त्यांच्यावर
आयुष्यभर असेच राहू दे
त्या सर्वाना सुखात,आनंदात
आणि समाधानात ठेव
हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
पुन्हा लागेल आस तुझ्या आगमनाची,
तुला पुन्हा डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल तो सोनेरी दिवस,
गणराया पुन्हा लागेल वेळ तुझ्या आगमनाचे.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय
पूर्ण करोत
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा.
!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!
मित्रांनो, आमची “Best Ganesh Visarjan Messages in Marathi” ही पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, हॅप्पी अनंत चतुर्दशी. हा संग्रह कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कारण तुमची मौल्यवान कमेंट आम्हाला अधिक आणि चांगले पोस्ट करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि प्रेरित करते. जर तुम्हाला हा संग्रह आवडला असेल, तर तो तुमच्या मित्रांसह, कुटुंबियांसह आणि जवळच्या लोकांसह Instagram, Facebook, Whatsapp इत्यादी सोशल मीडियावर शेअर करा. –धन्यवाद
FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न )
- 2023 मध्ये गणेश विसर्जन कधी आहे?
उत्तर: 2023 मध्ये गणेश विसर्जन 29 सप्टेंबर रोजी आहे. - विसर्जनाचे महत्त्व काय?
उत्तर: यथास्थान म्हणजे प्रार्थनेनंतर देवतेला आदरपूर्वक निरोप देणे आणि त्याच्या आशीर्वादाबद्दल परमेश्वराचे आभार मानणे. गणेश विसर्जन हे विदाईचे चिन्ह आहे जेथे उत्सवाच्या समारोपाच्या स्मरणार्थ भक्त गणपतीला भव्य पद्धतीने निरोप देतात. - गणपती विसर्जनामागील कारण काय?
उत्तर: गणेश चतुर्थीचा उत्सव जन्म, जीवन आणि मृत्यूच्या चक्राचे महत्त्व देखील दर्शवतो. गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढली असता घरातील विविध अडथळेही दूर होतात आणि विसर्जनासोबतच हे अडथळे नष्ट होतात, असा समज आहे. - गणेश विसर्जन कोणी सुरु केले?
उत्तर: गणेश चतुर्थीचा सार्वजनिक उत्सव 1893 मध्ये पुण्यात बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केला होता, परंतु तो प्रथम कधी किंवा कसा साजरा केला गेला हे माहित नाही. - विसर्जन ही संकल्पना काय आहे?
उत्तर: विसर्जन म्हणजे पूजेसाठी वापरण्यात येणारी वस्तू निसर्गाकडे परत करणे. हिंदू उपासना प्रतीकात्मकतेने भरलेली आहे आणि प्रत्येक कृती आणि विधीचा त्यामागे खोल आध्यात्मिक अर्थ आहे. पूजा करताना, निराकार असलेल्या देवतेला चित्र, मातीची प्रतिमा किंवा कलश अशा निर्जीव वस्तूमध्ये आवाहन केले जाते. - विसर्जनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
उत्तर: विसर्जन विधीची सुरुवात उत्तररंग पूजेने होते ज्यात गणपतीला खोल (तेल दिवे), पुष्प (फुले), धूप (धूप), गंध (सुगंध) आणि नैवेद्य (अन्न) या पाच वस्तू अर्पण केल्या जातात. विसर्जनाची वेळ आली की घराबाहेर पडण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन विसर्जन आरती करावी.