Best Bail Pola Wishes in Marathi | बैल पोळा शुभेच्छा 2023
Bail Pola Wishes in Marathi: पोळा हा मुख्यतः शेतकऱ्यांशी संबंधित सण आहे, हा सण विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि छत्तीसगडमध्ये साजरा केला जातो.
या दिवशी बैलांना कच्च्याप्रमाणे सजवून त्यांची पूजा केली जाते. मुले माती किंवा लाकडापासून बनवलेले छोटे बैल चालवतात. या दिवशी सायंकाळी बैलांच्या शर्यतींचेही आयोजन केले जाते. आणि या दिवशी बैलांसोबत कोणतेही काम केले जात नाही.
मित्रांनो, आज आम्ही तुम्हा सर्वांसाठी Bail Pola च्या शुभेच्छांचा संग्रह “Bail Pola Wishes in Marathi”घेऊन आलो आहे, जो तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासह शेअर करू शकता, आशा आहे की तुम्हा सर्वांना हा संग्रह खूप आवडेल.
Bail Pola Wishes in Marathi
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
संपलो जरी मी तरीही
तू धिर मात्र सोडू नकोस,
उजळेल पुन्हा दिस नवा
तू जगणे मात्र सोडू नकोस…
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे.
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सदभावना व्यक्त करण्याचा दिवस..
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
कष्टाशिवाय मातीला आणि
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.
हजारो वर्षापासून आपल्यासाठी
राबणाऱ्या बैलाचा सण पोळा
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
शेतकऱ्या सोबत कष्ट करितो
पिकवितो रान मोती
राबराब राबून घामाने
ओली झाली काळी माती.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आला आला रे बैल पोळा
गाव झालं सारं गोळा
सर्जा राजाला घेऊनी
सारे जाऊया राऊळा
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
राबूनिया वर्षभर
करीतो एक दिवस आराम
माझ्या राजाचा सच्चा साथी
करीतो वंदना राजा
आज त्याच्या दैवताची.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आला आला पोळा बैलांना सजवा
गोडधोड खाऊ घाला प्रेमाने कुरवाळा
वर्षभर गिरवायचाच असतो त्यांना मग
सतत कष्टाचाच पाढा.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील
मुख्य घटक असलेल्या मुक्या
प्राण्यांबद्दल कृतज्ञता,
व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैल पोळा.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज आहे बैलाला खुराक
बनवा पूरणाच्या पोळ्या
खाऊ द्या पोटभरून
मग आनंदाने साजरा करू पोळा.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई
सर्व शेतकरी बांधवांना
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन..
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
वावर वाडा सारी,बापाची पुण्याई
किती करू कौतुक तुझं
मीच त्यात गुंतून जाई
तुझ्या या कष्टाने फुलून
येते ही काळी आई.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आला आला पोळा बैलांना सजवा
गोडधोड खाऊ घाला प्रेमाने कुरवाळा
वर्षभर गिरवायचाच असतो त्यांना मग
सतत कष्टाचाच पाढा.!!
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
गेला तिफन, गेला कुळव,
शिवाळ गेली, बैल गेले,
ट्रॅक्टरचा जमाना आला,
दारात नाही सर्जा राजा,
नुसताच कोरडा बेंदूर आला,
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
जिवा शिवांची बैल जोड,
आला त्यांचा सण खास
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…,
तिफन,कुळव,शिवाळ,
शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा
आणि खास सण.
आपल्या शेतकऱ्यांचा सण.
आपल्यासाठी वर्षभर शेतात
घाम गळणार्या बैलाचा सण.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
कष्टाशिवाय व्यक्तीला आणि
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुझ्या अपार कष्टाने
बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेने
होऊ कसा उतराई.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
शेतामध्ये वर्षभर राबून
जो करतो धरणीमातेची सेवा
असे अपार कष्ट करतो
आपला सर्जाराजा
शेतकर्याच्या सच्चा मित्राला
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तूझ्या शॄंगारासाठी नेहमी
शेतकरी राजा सज्ज असतो
असा हा सण बैल पोळा…
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
शेतकऱ्यांच्या मुकुंदा…
प्रपंच आमुचे उजाड अंगण,
तुझ्याच घामाने होते नंदनवन…
घे मनमुराद आज सजून,
भाजी भाकर गोड मानून,
होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तू रे वाहान शिवाच,
कोणी म्हणे तूला नंदी,
तूझ्या असन्याने आहे
दारी चैतन्याची नांदी.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
नको लावू फास बळीराजा
आपुल्या गळा,
दे वचन आम्हास
आज दिनी बैल पोळा.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देणं,
बैला खरा तुझा सण,
शेतक-या तुझं रीन.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
वाडा शिवार सारं ,वडिलांची पुण्याई,
किती वर्णू तुझे गुण ,मन मोहरून जाई,
तुझ्या अपार कष्टानं ,बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पूजेनं ,होऊ कसा उतराई.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
जगाचा पोशिंदा असलेल्या
शेतकरी बांधवांना
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
कष्ट हवे मातीला….
चला जपुया पशुधनाला..
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आजीने घेतलेली एक मातीची बैलजोडी…
तिला स्वतःच्या हाताने चिखलाची
(काऊ माती) बैलगाडी ..काडीचे जु असा
सरंजाम करून खेळ मांडला जायचा…
सोबत गोड चकली असायचीच..
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
बळीराजाचा मित्र तू
त्यांच्या डोक्यावरचं छत्र
हरपू न देणारा तू, शेतकऱ्यांचा राजा तू
सुखातल्या क्षणांचा
गाजावाजा करून देणारा तू…
शेतकरी राजांच्या मातीची
पायाभरणी करून पिक
उत्पादन मिळवून देणारा तू…
कॄषिप्रधान लोकांना रुबाबदार ऐट मिळवून
देणारा सर्जा राजा तू…
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज बैलाले खुराक
रांधा पुरनाच्या पोया
खाऊ द्या रे पोटभरी
होऊ द्या रे मगदूल
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आला बेंदूर शेंदूर,सण वर्षाचा घेऊन,
खादेमळणी झाल्यावर,लागली चाहूल,
सर्जा-राजा गेले आनंदून,
शेतकरी बांधवाना
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
दे वचन आम्हास आज दिनी
बैल पोळा,नको लावू फास
बळीराजा आपुल्या गळा…!!
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
जिवा शिवांची बैल जोड,
आला त्यांचा सण खास.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
आज जरा घे थोडीशी विश्रांती,
आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,
कारण तुझ्यामुळेच पोट भागते आमचे आज.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
हजारो वर्षांपासून मानवासाठी
राबणाऱ्या बैलाचा सण पोळा.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तूझी कवड्याची माळ त्याला घुंगराचा नाद,
तूझ्या हंबराला आहे बळीराजा चा आवाज.
तूझी झूल नक्शिदार जस भरल शिवार,
तूझ्या शिंगांचा रूबाब जनु कनिस डौलदार.
पिंजलेला जिव सारा कुणब्याची घुसमट,
तुझ्या असन्यान धिर तूझ्या असन्यान थाट.
तूझ्या साथीला नमन तुझ्या श्रमाला नमन,
तूस्या सवे रान सार राहो सदा आबादान.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
बैल पोळ्याचा आलाय सण,
आज नसेल माझ्या मित्राला जुंपणं
त्यास सजवूनं आणेल मिरवूनं.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आला सण बैल पोळ्याचा..!
बैल राजाच्या कौतुक सोहळ्याचा..!
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
बळीराजाचा मित्र तू
त्यांच्या डोक्यावरचं छत्र
हरपू न देणारा तू.
शेतकऱ्यांचा राजा तू
सुखातल्या क्षणांचा
गाजावाजा करून देणारा तू…
शेतकरी राजांच्या मातीची
पायाभरणी करून पिक
उत्पादन मिळवून देणारा तू…
कॄषिप्रधान लोकांना
रुबाबदार ऐट मिळवून
देणारा सर्जा राजा तू.
!! बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!
मित्रांनो, तुम्हा सर्वांना आमची ही पोस्ट “Bail Pola Wishes in Marathi” कशी वाटली, जर तुम्हाला ती आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, तुमची एक कमेंट आम्हाला अधिक चांगली पोस्ट करण्यासाठी प्रोत्साहित करते, जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. – Thank you
बैल पोळा कधी आहे: यावर्षी बैल पोळा 14 सप्टेंबर 2023 रोजी श्रावण महिन्यातील अमावास्येला साजरा केला जाणार आहे.